|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात 90 दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात 90 दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   :
अमेरिकेकडून गुरूवारी अफगाणिस्तान येथील आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यात तब्बल 90 दहशतवादी ठघ्र झाल्याची माहिती समोर आली आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने अफगाणिस्तानमधील अधिकाऱयांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेने गुरूवारी अफगाणिस्तानमधील अचिन या जिह्यात नानगरहर येथील आयसिसच्या तळावर बॉम्बहल्ला केला होता. या भागात आयसिसचे अनेक मोठे नेते लपून बसल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती या भागात 600 ते 700 दहशतवादी असल्याचा दावा अमेरिकी सैन्याने केला आहे. अमेरिकेने हल्ल्यासी पहिल्यांदाच सर्वात मोठय़ा बिगर अण्विक बॉम्बचा वापर केला होता. मदर ऑफ ऑल बॉम्ब असे या बॉम्बला संबोधले जाते. या हल्ल्यात सुमारे 70 तळ उद्धवस्त झाल्याचा अंदाज आहे.

Related posts: