|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » leadingnews » नारायण राणेंचा भाजपप्रवेश तूर्त होल्डवर ?

नारायण राणेंचा भाजपप्रवेश तूर्त होल्डवर ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश तूर्त होल्डवर ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.त्यांच्या पक्षप्रवेशावर भाजपमधीलच काही नेत्यांमध्ये संभ्रम असल्याने राणेंचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. तसेच नारायण राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहायांची भेट घेतल्याचे वृत्त होते. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची कुणकुण भाजप नेत्यांना लागल्याने पक्षातील नेतेच त्यांच्या पक्षप्रवेशावर संभ्रमात होते.त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश सध्या होल्डवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: