|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पुन्हा हल्ला झाल्यास गंभीर परिणाम !

पुन्हा हल्ला झाल्यास गंभीर परिणाम ! 

रशिया, सीरिया तसेच इराणचा अमेरिकेला इशारा : जागतिक सुरक्षा धोक्याची येण्याची शक्यता केली व्यक्त

वृत्तसंस्था / मॉस्को

 रशिया, सीरिया आणि इराणने कठोर शब्दांमध्ये इशारा देत जर अमेरिकेने सीरियावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला करण्याची चूक केली तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. मॉस्को येथे रशियाचे विदेश मंत्री सर्जिलेव्हरॉव्ह यांची इराण तसेच सीरियन विदेशमंत्र्यांसह झालेल्या बैठकीनंतर हा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकद्वारे या प्रकारचा घेण्यात आलेला कोणताही निर्णय फक्त क्षेत्रीय नाही तर जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरेल असेही रशियाने बैठकीनंतर म्हटले. क्षेपणास्त्र हल्ल्याची चौकशी करविण्यासाठी टाळाटाळ करत नसून यात काहीही लपविण्यासारखे नसल्याचे रशियाच्या विदेश्मंत्र्यांनी सांगितले.

बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यात अमेरिकेद्वारे सीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्याची निंदा करण्यात आली. तसेच या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन ठरविण्यात आले. रशिया, सीरिया आणि इराणने याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करविण्याची देखील मागणी केली आहे. सीरियात रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 90 जण ठार झाले होते.

बैठकीत सीरियाचे विदेशमंत्री वालिद मोअल्लम आणि इराणचे विदेशमंत्री जावेद जरीफ यांनी अमेरिकेचा हल्ला अस्वीकारार्ह असल्याचे मत नोंदविले. सीरियात 4 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या रसायनास्त्राबाबत अमेरिकेने बशर अल-असाद सरकारला जबाबदार धरले होते.

तर सीरियाने रसायनास्त्राचा आरोप फेटाळत यात आपला हात नसल्याचा दावा केला होता. रसायनास्त्रात मारले गेलेले नागरिक टॉक्सिक एजंटमुळे ठार झाल्याचे आणि हे रसायन बंडखोरांनी लपवून ठेवले होते असे रशियाचे म्हणणे होते. रशियाने याविषयी अमेरिकेला लक्ष्य करत आपण याविरोधात संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणू असे म्हटले होते.

Related posts: