|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जगातील वृद्ध महिलेचे 117 व्या वर्षी निधन

जगातील वृद्ध महिलेचे 117 व्या वर्षी निधन 

रोम / वृत्तसंस्था

जगातील सर्वात वृद्ध महिलेचा वयाच्या 117 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. इटलीतील एमा मोरॅनो यांनी नुकताच शेवटचा श्वास घेतला. इटलीमध्ये जन्मलेल्या एमा यांनी दोन महायुद्धे, इटलीतील 90 हून अधिक राजकीय सत्ता पाहिल्या आहेत. त्या आपल्या 8 भावंडांमध्ये सर्वात जास्त आयुष्य जगलेल्या एकमेव आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1899 रोजी इटलीमध्ये झाला होता. एमा यांनी तीनही शतकं पाहिली आहेत. एमा रोज तीन अंडय़ाचा आपल्या आहारात समावेश करत होत्या. त्यातील दोन अंडी त्या कच्ची खात होत्या. एमा यांची आईसुद्धा 91 वर्षांचे आयुष्य जगली होती, तसेच त्यांच्या बहिणींनीही वयाची शंभरी ओलांडली होती.

Related posts: