|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तिहेरी तलाक नाकारल्याने महिलेवर ऍसिड हल्ला

तिहेरी तलाक नाकारल्याने महिलेवर ऍसिड हल्ला 

पिलिभित / वृत्तसंस्था

दुरध्वनीवरून दिलेला तिहेरी तलाक पत्नीने नाकारल्यामुळे तिच्यावर पतीने ऍसिड हल्ला केल्याची घटना रविवारी येथे घडली आहे. रेहाना (वय 40) असे या दुर्दैवी पत्नीचे नाव असून या हल्ल्यात तिला गंभीर जखमा झाल्या असल्याचे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

रेहानाचे 18 वर्षापूर्वी मतलूब नामक व्यक्तीशी झाले. त्यानंतर दोघेही अमेरिकेत वास्तव्यासाठी गेले. तेथे त्यांचे संबंध बिघडले. त्यानंतर ते भारतात काही काळासाठी परतले. नंतर पती एकटाच अमेरिकेला गेला. काही दिवसांनी पत्नीला तेथे बोलावून घेण्याचे आश्वासन त्याने दिले होते. तथापि त्याने गेल्या आठवडय़ात दुरध्वनीवरून तिला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले. तीन वेळा तलाक म्हणून आपले संबंध संपले आहेत. असे त्याने सांगितल्यानंतर पत्नीने तलाक नाकारला. याचा राग म्हणून तिच्यावर ऍसिड हल्ला करण्यात आला. सध्या या संबंधी पाच संशयितांवर तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी चालू आहे. पतीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.