|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवाराचे अनुकरण करा : मोदी

महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवाराचे अनुकरण करा : मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलयुक्त शिवार अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भावले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवारासारखे आभियान अन्य राज्यांनाही राबवावे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जलयुक्त शिवार मॉडेल बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ओदिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा रविवारी समारोप झाला. या बैठकीच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक केले. देशात दुष्काळावर मात करण्यासाठी अशी मोहिम गरजचेची असून अन्य राज्यांनाही या आभियान अनुकरण करावे असे मोदींनी सांगितले.

 

Related posts: