|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सुब्रतो रॉय यांच्या सहारा समुहाची पुण्यातील ऍम्बी व्हॅली या टाऊनशिपचा लिलाव करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाची लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना 28 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याबाबतची पुढील सुनावणीपूर्वी सहाराने काही ठोस पर्याय उपलब्ध करुन दिला तर लिलाव टाळता येऊ शकतो, असे संकेतही न्यायालयाने दिले. पुण्यातील सहारा समूहाची ऍम्बी व्हॅली ही टाऊनशिप जप्त करण्याचे आदेश देऊनही सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला मोठा दणका दिला आहे. याचबरोबर सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Related posts: