|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » 2019 पर्यंत कृषी कर्जमाफी देशाच्या जीडीपीच्या 2 टक्के

2019 पर्यंत कृषी कर्जमाफी देशाच्या जीडीपीच्या 2 टक्के 

अनेक राज्यांची आर्थिक तूट 3.5 टक्क्मयांवर

वृत्तसंस्था/ मुंबई

उत्तर प्रदेशात शेतकऱयांना कर्जमाफी करण्यात आल्यानंतर अन्य राज्यांतूनही कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे. सरकारच्या या लोकप्रिय घोषणेमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्जमाफीचा आकडा जीडीपीच्या 2 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज बँक ऑफ अमेरिका मेरिल लिचने व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केल्याचा आकडा राज्याच्या जीडीपीच्या 0.4 टक्के आहे. देशातील सर्वात मोठय़ा राज्यात कर्जमाफी करण्यात आल्यानंतर अन्य राज्यांतही कृषी कर्ज माफ करावे अशी मागणी करण्यात येत आहे. कोणत्याही योजनेची घोषणा करण्यापूर्वी आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात यावा असे केंद्र सरकारकडून राज्याला सांगण्यात आले आहे. कर्जमाफीच्या घोषणेने राज्यांच्या आर्थिक तूटीचा आकडा 3-3.5 टक्क्यांवर पोहोचेल. सध्या अनेक राज्ये पहिल्यांदाच 3.5 टक्के आर्थिक तूटीचा सामना करत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि तामिळनाडूत कर्जमाफीची मागणी जोरात करण्यात येत आहे. चेन्नई उच्च न्यायालयाने राज्यातील शेतकऱयांचे 4 हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्याचा आदेश दिला आहे. एसबीआय अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी कर्जमाफीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल असे म्हटले आहे.

Related posts: