|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » नोटाबंदीचा भारताच्या अर्थसत्तेवर सकारात्मक परिणाम : जागतिक बँक

नोटाबंदीचा भारताच्या अर्थसत्तेवर सकारात्मक परिणाम : जागतिक बँक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :
नोटाबंदीच्या तात्कालिन परिणामांकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन विचार करता या निर्णयाचे भारताच्या विकासावर सकारत्मक परिणाम दिसून येतील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे अर्थिक बळकटीकरण आणि पारदर्शक येईल, अशी आशाही बँकेने व्यक्त केली आहे.

जागतिक बँकेचा दक्षिण अशियासंदर्भातील आर्थिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात नोटाबंदीवर भाष्य करण्यात आले आहे. भ्रष्टाचार आणि करचोरी थांबवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, हे एक क्ठीण काम असून, यासाठी वेळोलेळी असंख्य उपाययोजना राबवाव्या लागतील, असे अहवालात म्हटले आहे. नोटाबंदीमुळे चलन तुटवडय़ाची समस्या निर्माण झाली आणि त्याचे परिणाम आर्थिक विकासावरही दिसून आले हेते.

काळा पैसा, बोगस नोटा आणि डिजिटल चालना देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण करचोरी आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी अथक मेहनत घेण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. नोटाबंदीमुळे पारदर्शकसोबत आर्थिक बळकटीही येईल. पण यासाठी रोखीने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहारांवर भर देण्याची गरज आहे. नोटाबंदीपूर्वी भारतात रोखीने होणाऱया व्यवहारांचे प्रमाण सर्वाधिक होते. पण गेल्या काही महिन्यात पेडीट आणि डेबिट कार्टद्वारे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले असही अहवालात म्हटले आहेत.

 

Related posts: