|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » मद्यसम्राट विजय मल्ल्याला जामीन मंजूर

मद्यसम्राट विजय मल्ल्याला जामीन मंजूर 

ऑनलाईन टीम / लंडन  :

Live Update (4:56) :

कोटय़वधींचे कर्ज बुडवणाऱया मद्यसम्राट विजय मल्ल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडनमधून अटक करण्यात आली. मात्र, अवघ्या तीन तासांतच विजय मल्ल्याला वेस्टमिन्स्टर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

देशातील विविध बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला आज अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या सूचनेवरुन स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून मल्ल्याला अटक करण्यात आली.

गेल्या वर्षी विजय मल्ल्याने हजारो कोटींचे कर्ज थकीत ठेवून भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याच्या हालचालीही सुरु करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर 9 हजार कोटींचे थकीत कर्ज असल्याने या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या मालकीची असलेली किंगफिशरसह त्याच्या मालकीची असलेली सगळी संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले होते. यातच भारताने लंडन पोलिसांना केलेल्या सूचनेवरुन आज अखेर मल्ल्याला लंडनमधून अटक करण्यात आली आहे.

मल्ल्याला आता वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर त्याचा ताबा लवकरच भारत सरकारकडे देण्याबाबत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

 

Related posts: