|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर, नगरसेविकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा कामांची प्रशंसा

चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर, नगरसेविकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा कामांची प्रशंसा 

नवी मुंबई / प्रतिनिधी

नवी मुंबई हे नावाप्रमाणेच नव्या गोष्टींचा स्विकार करणारे नवे शहर असून येथील अनेक नागरी सुविधा कामे उत्तम दर्जाची आहेत. त्यामुळे नवी मुंबईने अनेक पुरस्कार मिळविलेले असून या अभ्यास दौल्ल्यातून खूप काही नवे अनुभवायला व शिकायला मिळाले असे सांगत चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर. आशा जसवाल यांनी चंदीगड शहरात यातील अनेक गोष्टींचा उपयोग होईल अशा शब्दात नवी मुंबई शहराविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला आज चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरांसह सात नगरसेविका आणि अधिकाल्ल्यांनी अभ्यास भेट देवून विशेषत्वाने पर्यावरण विषयक प्रकल्पांची पाहणी केली. याप्रसंगी महापौर  सुधाकर सोनवणे, उप महापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्री. शिवराम पाटील, सभागफह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले, राष्ट्रवादी पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, काँग्रेस पक्षप्रतोद श्रीम. अंजली वाळुंज, भाजपा पक्षप्रतोद श्री. रामचंद्र घरत, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांनी उपस्थित अभ्याससमुहाचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ सभागफहात स्वागत केले.

या अभ्यास समुहात चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर श्रीम. आशा जसवाल, माजी महापौर तथा नगरसेविका    श्रीम. राजबाला मलीक, नगरसेविका श्रीम. सुनिता धवन, श्रीम. शिलादेवी, श्रीम. फार्मिला, श्रीम. चंद्रावती शुक्ला, श्री. राजेश कुमार यांच्यासह सह आयुक्त डॉ. शिल्पी पात्रा, मुख्य अभियंता श्री. नरेंद्रपाल शर्मा, कार्यकारी अभियंता श्री. हरीश सैनी सहभागी होते.

यावेळी अतिथींचे स्वागत करताना महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी चंदीगड हे सुनियोजित व सुंदर शहर आहेच. असे असताना त्यांनी पाहण्यासाठी नवी मुंबईसारख्या आणखी एका सुनियोजित व आधुनिक शहराची निवड केली त्याबद्दल समाधान व्यक्त करीत या अभ्यास दौल्ल्यातून नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकल्पांचा अभ्यास करता येईल व याचा उपयोग निश्चित चंदीगड शहराच्या विकासासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी चंदीगड हे देखील देशातील एक नावाजलेले व सुनियोजित शहर असून एकमेकांकडून बरेच काही घेण्यासारखे आहे असे मत व्यक्त करीत चंदीगड शहराला यापूर्वी दिलेल्या भेटीतील वेगळे अनुभव सांगितले.

शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनमधून नवी मुंबई शहराची व वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांची सविस्तर माहिती अतिथींना दिली. यावेळी या अभ्यास गटाने राजमाता जिजाऊ सभागफहात सुरु असलेल्या मासिक सर्वसाधारण सभेस भेट दिली व  नगरसेवक दृ नगरसेविकांशी सुसंवाद साधला. सभागफहातील नगरसेविकांची लक्षणीय संख्या बघून चंदीगडच्या महापौर श्रीम. आशा जसवाल यांनी महिला सबलीकरणाचे मुर्तीमंत दर्शन या सभागफहात घडते असे म्हटले. नवी मुंबई महानगरपालिकेने वैशिष्टयपूर्ण नागरी सुविधांमुळे सातत्याने इतकी पारितोषिके मिळविलेली आहेत की इतरांनाही पारितोषिके मिळावित याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने यापुढे स्पर्धेतच उतरू नये असे त्या गमतीने म्हणाल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा कामांचे व भविष्यातील नियोजनाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरांसह नगरसेविका व अधिकारी वर्गाने महापालिका मुख्यालय तसेच तुर्भे एम.आय.डी.सी. येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सेक्टर 50 नेरुळ येथील सील्ल्टेक अत्याधुनिक मलप्रक्रिया पेंद्र, घरोघरी जाऊन कचरा संकलनाची पध्दती, वंडर्स पार्क, निसर्गोद्यान कोपरखैरणे अशा विविध प्रकल्पांना भेटी देऊन तेथील कार्यपध्दती जाणून घेतली. यातील अनेक प्रकल्प शहराच्या भविष्यातील वाढीचा विचार करून आखण्यात आल्याबद्दल त्यांनी नियोजनाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीला भेट देवून या ठिकाणची पर्यावरणूरक कार्यप्रणाली जाणून घेतली.

Related posts: