|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » इसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधरमधून अटक

इसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधरमधून अटक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून अटक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने ही संयुक्त मोहिम राबवत ही कारवाई केली आहे.

जगभरात आपल्या क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणाऱया इसिस या दहशतवादी संघटनेत हल्ला घडवण्यासाठी नव्या तरुणांची भरती सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांची विशेष शाखेच्या दहशतवादी पथकाने या देशभरात कारवाई केली. या कारवाईमध्ये पंजाबमधील जालंधर, बिजनोरमधील बरहापूर आणि मुंबईतून पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

Related posts: