|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्विकृतसह समिती सदस्यांची निवड

स्विकृतसह समिती सदस्यांची निवड 

  सोलापुर :

महापालिकेच्या पाच सदस्यांसह सात समित्यांच्या 54 सदस्यांची निवड झाली आहे. स्विकृत सदस्यांमधे भाजपच्या दोन्ही जागी पालकमंत्री देशमुख गटाच्या सदस्यांनी बाजी मारली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे उमेदवार अविनाश महागावकर यांच्यासाठी बरीच फिल्डींग लावली पण अखेर प्रभाकर जामगुंडी यांचे नाव जाहिर झाल्याने मालक गटाचा वरचष्मा झाला. सेना, काँग्रेस, एमआएमचे प्रत्येकी एक सदस्यांची निवड करण्यात आली. 

  गुरूवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेटटी् यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये पाच स्विकृत सदस्य आणि समिती सदस्यांच्या निवडी करण्यात आला. भाजपा, शिवसेना आणि एमआयएम पक्षाला झालेली बंडखोरी शमविण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करावी लागली. खासकरुन भाजपमधील खेचाखेचीच्या राजकारणानंतर दोन देशमुखांमधील मालक गटाने आपले वचस्व कायम राखले असे म्हणावे लागेल.   

 महापालिकेच्या स्विकृत सदस्यांची निवड करण्याच्या विषयावरून भाजपाच्या दोन्ही देशमुख मंत्री यांच्यातील रस्सीखेच शेवटपर्यंत चालु होती. काँग्रेसने पुन्हा ज्येष्ठाला स्थान देत यु. एन. बेरिया यांना पुन्हा एकदा संधी दिली. एमआयएम कडुन गाजी इस्माईल सादिक जहागीरदार यांची निवड झाली. स्विकृत सदस्य निवडीसाठी तब्बल 16 अर्ज दाखल झाले होते.

निवडणूकीतही भाजप पदाधिकाऱयांचा अंतर्गत संघर्ष चव्हाटय़ावर आला होता. उमेदवारी देताना दोन्ही देशमुख मंत्रीव्दयामध्ये जोरदार अतंर्गत संघर्ष पहावयास मिळाला होता. हा अंतर्गत संघर्ष या दोन्ही पक्षातील नेतृत्वामध्ये निवडणूकीनंतरही सुरूच असल्याची बाब स्विकृत सदस्य निवडीच्या विषयावरून पुन्हा एखदा समोर आली आहे. त्यातीलच वरचढ वा परतफेड या निवडीवरुन झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी यु. एन. बेरिया यांचे नांव सुचित केले. त्यानंतर बेरिया यांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱयांच्यासमवेत आपला उमेदवारी अर्ज अन् त्यांची निवड अंतिम ठरली. 

Related posts: