|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मणिपाल हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेन डेथ’चा पहिला रुग्ण

मणिपाल हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेन डेथ’चा पहिला रुग्ण 

पणजी :

दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलने मेंदू विकार झालेल्या आणि आयुष्य संपत आलेल्या पहिल्या 71 वर्षीय रुग्णाचे त्याच्या कौटुंबिक संमतीने ‘ब्रेन डेथ’ निधन झाल्याचे जाहीर केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मणिपाल हॉस्पिटलच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून तीच संकल्पना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात राबवण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘ब्रेन डेथ’ची माहिती देण्यासाठी मणिपाल हॉस्पिटलने एक कार्यक्रम आखला होता. त्यावेळी आरोग्यमंत्री उपस्थित होते. मणिपालच्या व्यवस्थापनाने सुरू केलेल्या या बेन डेथ उपक्रमाचे स्वागत करून ते म्हणाले की सरकारने याची दखल घेतली असून त्यासाठी रुग्ण शोधून काढणे आणि त्याचे बेन डेथ जाहीर करणे बांबोळी इस्पितळात होणे शक्य असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. रुग्णांच्या कुटुंबाला या मोहिमेत सामील करून घेऊन त्यांचा वेळ, पैसा वाचवू शकतो तसेच त्यांना दिलासा देऊ शकतो. इतकेच नव्हे तर त्या रुग्णाचे इतर अवयव इतरांसाठी वापरात येऊन वरदान ठरू शकतात असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.

या प्रकरणी पुढाकार घेणाऱया इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा विभागाचे आरोग्यमंत्र्यांनी अभिनंदन करून हा उपक्रम गोमंतकीय रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related posts: