|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » सावरकारांनी राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले : शहा

सावरकारांनी राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले : शहा 

ऑनलाईन टीम / ठाणे :

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जनतेने वीर ही पदवी दिली, त्यांनी राष्ट्रभक्तीतून चेतना निर्माण केली, त्यांनी राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले, सावरकारांचे विचार आजही प्रेरणा देतात, असे गौरोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले.

29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी शहा बोलत होते. ते म्हणाले, स्वा. सावरकरांनी राष्ट्रभक्तीचे कार्य केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांचे विचार राष्ट्रहितासाठी उपयुक्त आहेत. सावरकरांचे साहित्य म्हणजे अंधारात तळपणारी वीज आहे. त्यांचे विचार केवळ साहित्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असे आहे. त्यांचे विचार तरुणपीढीसाठी मार्गदर्शक आहेत.