|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नौदल प्रमुख सुनिल लांबा यांची गोवा शिपयार्डला भेट

नौदल प्रमुख सुनिल लांबा यांची गोवा शिपयार्डला भेट 

प्रतिनिधी / वास्को

भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी गुरूवारी गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट देऊन गोवा शिपयार्डच्या प्रगतीची पाहणी केली.

गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त ऍडमिरल शेखर मित्तल यांनी नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांना गोवा शिपयार्डच्या प्रगतीची  सविस्तर माहिती त्यांना दिली. श्री. लांबा यांनी यावेळी भारतीय तटरक्षक दल व नौदलाच्या गोवा शिपयार्डमध्ये चाललेल्या प्रकल्पांविषयी व शिपयार्डच्या उत्पादन क्षमतेविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी माईन काऊन्टर मेजर व्हेसल्स (एमसीएमव्ही) प्रकल्पाच्या कामाची तसेच गोवा शिपयार्डच्या जहाज बांधणी व जहाज दुरूस्ती कामाची व मॉरिशस तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या जहाजाची ऍडमिरल लांबा यांनी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रियर ऍडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी नौदलाचे इतर अधिकारी व गोवा शिपयार्डचे संचालक उपस्थित होते.

नौदल प्रमुख ऍडमिरल लांबा यांनी गोवा शिपयार्ड कार्यक्षम असल्याचा विश्वास व्यक्त करून गोवा शिपयार्डच्या प्रगतीचे कौतुक केले.

Related posts: