|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राखण करणारी अदृष्य शक्ती म्हणजेच परमेश्वर

राखण करणारी अदृष्य शक्ती म्हणजेच परमेश्वर 

सुब्रमण्यम स्वामींचे होंडा येथील आजोबा देवस्थानच्या वर्धापन सोहळय़ात प्रतिपादन

वार्ताहर / होंडा

राखण करणारी अदृष्य शक्ती म्हणजेच परमेश्वर होय. ईश्वर हा सर्वत्र कणांकणांत भरलेला आहे. अशा या अदृष्य शक्तीची भक्ती अनेक मार्गांनी करता येते. ज्ञान, कर्म व भक्ती हे मार्ग असून भक्तीमार्ग सगळय़ात सोपा आहे. मूर्ती मध्ये शक्ती असते ही शक्ती पाहण्याची नजर आपल्यात असायला पाहिजे. अग्निपूजा, यज्ञ व धार्मिक विधींमुळे परिसरातील वातावरण शुद्ध होते. आजोबाचे भक्त सात्विकवृत्तीचे आहेत, म्हणून हे सद्कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन पू. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते कुडणे-होंडा सीमेवरील आजोबा देवस्थानच्या आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामींचे गोव्यातील शिष्य श्रद्धानंद स्वामी, आजोबाचे भक्त सुरेश माडकर, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई, सगुण वाडकर, सावळाराम महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

आजोबा देवस्थानच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश गावस व कुडणे देवस्थानचे अध्यक्ष सुरेश मळीक यांच्याहस्ते व मिलींद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी मोठय़ा उत्साहात करण्यात आले.

स्वामींची पाद्यपूजा ज्योती केरकर व संदीप केरकर यांनी केली. यावेळी स्वामींच्याहस्ते 15 ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यात लक्ष्मी पणशेकर, चंद्रकांत कामत, श्रीकांत माडकर, ज्ञानदेव पाटील, रमेश नाईक, पंढरी गांवस, गजानन उसपकर, सावित्री देसाई, श्रीकांत शिरोडकर, मोहनराव कुलकर्णी, विश्राम गावडे, नरहरी बर्वे, चंद्रकांत माडकर व भगवंत मळीक यांचा समावेश आहे.

यावेळी सूत्रसंचालन गुरूदास सामंत यांनी केले. स्वामींसह इतर मान्यवरांचा परिचय गोविंद खानेलकर यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी अनंत धुमे, संदीप मणेरकर, क्षितीजा देसाई, ऋतुजा च्यारी व जयEिसग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आभारप्रकटन सचिव सत्यवान नाईक यांनी केले. या कार्यक्रमानंतर आजोबाची महाआरती, गाऱहाणे होऊन महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला.

 

Related posts: