|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलेला आत्मसात करण्याची गरज

कलेला आत्मसात करण्याची गरज 

प्रतिनिधी/ पणजी

कला ही जन्मापासून आपल्याबरोबर असते, तिला आत्मसात करुन घेण्याची गरज असते. कोणतीही कला ही देवाने आपल्याला दिलेली सुरेख देणगी आहे. या कलेचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे, असे प्रतिपादन इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ चित्रकार संजय हरमलकर केले. ते पणजीतील कला अकादमीत आयोजित चित्रकार उजमा खान यांच्या ‘सेरेनीटी’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.    

यावेळी हरमलकर पुढे म्हणाले की, उजमा खान यांच्या सारख्या युवा चित्रकारांना पाहिल्यानंतर या कलेच्या क्षेत्रात उज्वल भवितव्य आहे असल्याचे स्पष्ट दिसून येते. कुठल्याही फाईन आर्टस् विद्यालयातून किंवा कुठल्याही कलेच्या वर्गात न शिकता त्यांनी ही काढलेली चित्रे अप्रतिम आहेत. त्यांनी काढलेल्या प्रत्येक चित्रात खूप बारीकता असून आपले विचार त्यांनी उत्तमरित्या या चित्रांतून व्यक्त केले आहेत. तीने काढलेले प्रत्येक चित्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व हीच खऱया कलाकाराची ओळख असते, असे हरमलकर यांनी पूढे सांगितले.

उजमा खान यांनी नुकतीच औषधशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून  भविष्यात त्या कलेला वेळ देणार असल्याचे समजते. उजमा खान यांनी ‘वॉटर कलर’, पेन, व इन्कच्या साहाय्याने ही चित्रे काढली आहेत. पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

Related posts: