|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत भरला फळ महोत्सव

पणजीत भरला फळ महोत्सव 

प्रतिनिधी / पणजी

 बोटानिकल सोसायटी ऑफ गोवा तसेच पणजी महानगरपालीका यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून कांपाल येथील लुईस गोमस् उद्यानात कोकण फळ महोत्सव भरण्यात आला आहे. याठिकाणी आंब्यांच्या तसेच केळी तसेच अन्य कोकणात आढळणाऱया विविध फळांची दालने उभारण्यात आली आहे.

 

आंब्यांच्या विविध प्रजाती

 सध्या आंब्यांचा हंगाम असल्याने या ठिकाणी राज्यात आढळणारे आंब्या पैकी मानकुराद, हापुस, पायरी, तोतापुरी, मालदेज तसेच लहान आंबे (घोटा) यांची दालने उभारण्यात आली आहे. राज्याभरातील आंबे उत्पादकांनी आपले आंबे या ठिकाणी प्रदर्शंन तसेच व्रिकीस ठेवले आहे. तसेच कोकणातून आलेले हापुस आंबेही लोकांचे आकर्षण ठरत आहे. आंब्याच्या अनेक प्रजाती या ठिकाणी आम्हाला पहायला मिळत आहे. यात जास्त जास्त हे मानकुराद आंब्यांचे स्टॉल आहे.

अन्य विविध फळांचे प्रदर्शन

 या ठिकाणी आंब्ंयाप्रमाणे राज्यात आढळणाऱया अन्य विविध फळांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यात केळी, अननन, फणस, नारळ, लिंबू, चिकु, पपई, काजू, कोकम, जांभुळ, तसेच अन्य विविध फळांची दालने उबारण्यात आली आहे. फळ उत्पादकांनी आपल्या शती बागायतीमध्ये पिकविण्यात येणारी फळे या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. तसेच फळांविषयी माहिती देणारी विविध स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. तसेच यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यंदाच्या महोत्वामध्ये गावठी केळी आंबा यांच्यावर जास्त भर देण्यात आला आहे.

 या महोत्सवामध्ये आंबा बागायतदार मोठय़ा संख्येने सहभागी झाले असून,  कृषी खाते, भारतीय कृषी संशोधन केंद्र, पश्चिम घाट कोकण फाऊंडेशन, गोवा कंझ्युमर्स ऍक्शन नेटवर्क, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटिक मॅनेजमेंट (बारामती) गोवा फलोत्पादन महामंडळ, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.

 या शिवाय या महोत्सवामध्ये विविध फळांचे प्रदर्शन तसेच गोवा कृषी महाविद्यालयातर्फे लोककला सादर केली जाणार आहे. गोव्याबरोबरच कोकण कृषी महाविद्यालय, वेंगुर्ला सहभागी होणार आहे. यावेळी काजू आंबा या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कृषी संशोधन केंद्रातर्फे शेतकऱयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हा महोत्सव सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. आज तसेच उद्यापर्यंत हा महोत्सव असणार आहे.

Related posts: