|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » …तर राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावेत

…तर राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावेत 

प्रतिनिधी/ मडगाव

राज्य निवडणूक आयोग पंचायत निवडणुका वेळेवर घेण्यास बांधिल आहे. यासंदर्भातील वैधानिक आणि घटनात्मक बांधिलकी तो टाळू शकत नाही. कायदा आणि घटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे त्या राज्यपालांशी तत्काळ राज्य निवडणूक आयोगाने संपर्क साधावा आणि गरज पडल्यास आपले स्वातंत्र्य व बांधिलकी अबाधित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी, असा सल्ला माजी राज्य निवडणूक आयुक्त प्रभाकर तिंबले यांनी दिला आहे. 

पंचायत निवडणुकांची तारीख राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून ठरविण्याचा अधिकार निश्चितच सरकारला पोहोचतो. पण याचा अर्थ पंचायतींचा कार्यकाळ संपून गेल्यानंतर निवडणुका घेण्याची मोकळीक सरकारला राहते असा नव्हे. पंचायतराज व्यवस्था आणि घटनेच्या चौकटीत ते बसत नाही, असे मत तिंबले यांनी व्यक्त केले आहे.

Related posts: