|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला

एसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला 

एसटी कर्मचाऱयांच्या वेतन करारासंदर्भातील वाटाघाटीची प्रक्रिया लवकरात लवकर संपवून कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे वाटीघाटी समितीच्या बैठकांमधील चर्चेसाठी वेग आला झाला आहे.

एसटी महामंडळात एसटी कर्मचाऱयांना वेतन कराराच्या संदर्भामध्ये शुक्रवारपर्यंत एसटी प्रशासन आणि मान्यप्राप्त संघटना यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून संघटनेच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील मागणी अयोग्य असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच चौथ्या आणि पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या निरीक्षणानुसार वेतन आयोग सार्वजनिक उपक्रमास लागू करणे अयोग्य असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले होते. तरी देखील संघटनेने एकाच मागणीवर अडून बसून वाटाघाटीच्या अनेक फेऱया इतर छोटय़ा मागण्यावर चर्चा करण्यात घालवले आहेत. याच कालावधीमध्ये एसटी महामंडळातील 12,514 कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱया कर्मचाऱयांच्या प्रश्नाबाबत संघटनेने अनास्था दाखविलेल्या दिसून येते. याबाबतीत देखील प्रशासनाने संघटनेला कर्मचाऱयांची कनिष्ठ करण्याची संधी दिली होती, परंतु संघटनेने प्रतिसाद दिला नाही. यावेळी इतर संघटनेला कर्मचाऱयांची कनिष्ठ वेतनश्रेणीवर तीन वर्षावरून एक वर्षांपर्यंत करण्याचा तसेच या कर्मचाऱयांना सहा महिन्यानंतर 500 रुपये एवढी वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. परिणामी संघटनेने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचे कामगार हिताची बाजू घेण्याची आणखी एक संधी त्यांनी गमावली आहे. नुकत्याच झालेल्या वाटाघाटीच्या बैठकीमध्ये प्रशासनाने कामगारांच्या भावना लक्षात घेऊन संघटनेने लवकरात लवकर वेतन करार होण्याच्या दृष्टीने वेतनासंदर्भातील नवीन मागणी सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर संघटनेने 22 एप्रिल रोजी वार्षिक अधिवेशनानंतर नवीन मागण्यांचा मसुदा सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह परिवहन आयुक्त व संचालक, अधिकारी, महाव्यवस्थापक (वाहतूक), मुख्य कामगार अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

 

Related posts: