|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाडे वास्कोतील पै इन्फर्टिलिटी सेंटरमधिल किमया

वाडे वास्कोतील पै इन्फर्टिलिटी सेंटरमधिल किमया 

वास्को

पै इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये बुधवारी 19 एप्रिल रोजी एका अपत्य नसलेल्या स्त्रीने कृत्रीम गर्भधारणेनंतर उपचार करून निरोगी तिळय़ांना जन्म दिला. या तिन्ही मुलांचे वजन 2.2, 2.5 व 2.7 किलो एवढे आहे. त्यांना एनआयसीयू क्रिटीकल केअरची गरज भासली नाही. एरव्ही जेव्हा दोन पेक्षा अधिक मुलांची गर्भधारण होते. तेव्हा त्यांच्या जन्माच्यावेळी वजन खूप कमी असते. त्यांना लहान मुलांच्या आयसीयूमध्ये ठेवावे लागते.

वास्कोतील पै इन्फर्टिलिटी सेंटर एप्रिल 2016 मध्ये सुरू करण्यात आले असून आतापर्यंत या केंद्रात पन्नासहून अधिक कृत्रीम गर्भधारणा उपचार पद्धती करण्यात आलेल्या आहेत. त्यात बऱयाच अपत्य नसलेल्या स्त्रीयांना गर्भधारणा झाली आहे.

वंध्यत्व किंवा गर्भधारणेच्या असमर्थतेमुळे जगभरातील लाखो लोकांना ही समस्या सतावत आहे. उशिरा विवाह, ओटी पोटाचा त्रास, हार्मोन्समध्ये असंतुलन, तणावातील जीवन आदी अनेक वंध्यत्याची कारणे आहेत. आज गर्भधारण साध्य करण्यासाठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध झाल्याने मोठी समस्या दूर झाली आहे. आज तंत्रज्ञाानांच्या सहाय्याने एक स्त्री गर्भवती होऊ शकते व तिला आपल्या पालकत्वाचा अधिकार मिळू शकतो.

कृत्रीम गर्भधारणेचे उपचार डॉ. मयुर पै यांनी यशस्वीरित्या केले आहेत. ते या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांच्यामते जोडीदारांमध्ये निदान करणे कठीण व अवघड काम आहे. अशावेळी कृत्रीम गर्भधारणेचे उपचार करून एका स्त्रीला तिचे पालकत्वाचे स्वप्न पूरे करणे खूप आनंददायी असते.

भ्रूणशास्त्रज्ञ कपिल रायतुरकर यांनी गेल्या वीस वर्षात कृत्रीम गर्भधारणांची टक्केवारी अनेकपटीने वाढलेली असल्याचे सांगितले. या उपचार पद्धतीमुळे आर्थीक, शारीरिक, मानसिक त्रास होता व वेळही वाया जातो. पण नवीन तंत्रज्ञानामुळे बहुतेक जोडप्यांना गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते.

पै इस्पितळाचे संचालक डॉ. श्रीधर पै यांनी इस्पितळाच्या इन्फर्टिलिटी सेंटरच्या टिमचे अभिनंदन करून सांगितले की, या केंद्रात अधिकाधिक नवीन प्रगत तंत्राद्वारे उपचार करण्याचे इस्पितळाचे ध्येय राहील व त्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्याची इच्छा प्रगट केली.

Related posts: