|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपतिपद निवडणूक ; सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर

राष्ट्रपतिपद निवडणूक ; सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाल येत्या 24 जुलैला संपत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पद मिळवण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, सध्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने आयोध्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर आरोपी म्हणून खटला चालवण्यात यावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे या पदासाठी सुषमा स्वराज यांचे नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी अडवानी यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. अद्यापही अडवानी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच स्वच्छ प्रतिमा आणि परराष्ट्र मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱया स्वराज यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदी त्यांची निवड होण्याची जास्त शक्यता मानली जात आहे.

Related posts: