|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कुटुंबातील तिघांची गळफासाने आत्महत्या

कुटुंबातील तिघांची गळफासाने आत्महत्या 

पनवेल-कामोठे येथील घटनेने खळबळ   पोलिसांकडून मृतांच्या नातेवाईकांचा शोध सुरू

प्रतिनिधी/ पनवेल

कामोठे वसाहतीत राहणाऱया तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सदर कुटुंबीय हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर त्यांना असलेली मुलगी ही मतीमंद होती.

कामोठे वसाहतीतील सेक्टर-36 इंद्रविहार रेसिडेंसी फ्लॅट नं.-503 येथे दत्त कुटुंबीय राहत होते. सुनील उर्फ इंद्रजित दत्त (50), पत्नी डॉ. जस्मिन पटेल (45) आणि 16 वर्षीय मुलगी ओशिन अशी त्यांची नावे आहेत. रविवारी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे घरकाम करणारी मोलकरीण घरी आली असता तिला हॉलमध्ये सुनील उर्फ इंद्रजित दत्त यांचा मफतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. तर त्यांची पत्नी आणि मुलीचा मफतदेह बेडरूममधील बेडवर ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात तिने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांकडे माहिती दिल्यानंतर तातडीने कामोठे पोलिसांना ही गोष्ट कळविण्यात आली. पोलिसांना सुनील उर्फ इंद्रजीत दत्त यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी ‘आपली पत्नी आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून त्या दोघांचे मफतदेह खाली उतरवून मी स्वत: आत्महत्या करीत आहे’, असे लिहून ठेवले होते. तर डॉ. जस्मिन पटेल यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘मी मला असलेल्या आजारपणाला कंटाळून नैराश्येपोटी आत्महत्या करीत आहे. माझ्यामागे मतिमंद मुलीला कोण पाहण्यास नसल्याने आम्ही दोघी आत्महत्या करीत आहोत. आमचे मफतदेह केईएम हॉस्पिटलमध्ये ठेवावेत’, असे लिहून ठेवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तिन्ही मफतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.