|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात शेकडो प्राथमिक शिक्षक अतिरिक्त

राज्यात शेकडो प्राथमिक शिक्षक अतिरिक्त 

प्रतिनिधी/ पणजी

अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याने आणि काही शाळा एक शिक्षकी झाल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त झाले असून त्यांना विद्यार्थी वर्गाच्या हितासाठी योग्य त्या ठिकाणीच्या शाळेत पाठवावे अशी सूचना मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षण खात्याला केला आहे.

सर्व शिक्षा अभियानचा 2016…17 चा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयाने शेकडो शिक्षक अतिरिक्त झाल्याचा निश्कर्ष काढला आहे. त्यांना कामाविना अतिरीक्त न ठेवता गरज असलेल्या शाळांमध्ये पाठवण्याचे मंत्रालयाने सुचित केले आहे. सर्व शिक्षा अभियानच्या अहवालानुसार एक शिक्षकी शाळांची संख्या 366 होती. त्या शिवाय 50 पेक्षा कमी मुले असलेल्या 740 शाळा आहेत, 30 पेक्षा कमी मुले असलेल्या शाळांची संख्या 593 असून 15 पेक्षा कमी मुले असलेल्या शाळा 271 आहेत.

मुले कमी होत असल्याने शिक्षक अतिरीक्त ठरत असून 24 मुलांमागे  एक शिक्षक असे जे प्रमाण आहे ते राखता येत नाही. एक शिक्षकी शाळेत एकच शिक्षक पहिली ते चौथी पर्यंतच्या चारही वर्गाना शिकवतो. कालांतराने मुले कमी होते आणि शिक्षकांची संख्या मुलांपेक्षा जास्त अशी परिस्थिती येवू शकते म्हणून शिक्षण खात्याने शिक्षकांचे विकेंद्रीकरण करावे असे मंत्रालयाने म्हटले आहे.

अतिरिक्त झालेले शिक्षक शहरी भागात बदलीसाठी प्रयत्न करीत असून तसे त्यांचे अर्ज शिक्षण खात्याकडे पोचत आहेत. ग्रामीण भागात रहायला आणि जायला कोणी तयार नसल्याने शेवटी शिक्षण खात्याला शिक्षकांसाठी 15 वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याची अट घालणे बंधनकारक करावी लागली आहे.

Related posts: