|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गडय़ांच्या जत्रे’च्या खांबाचे वाजतगाजत स्वागत

गडय़ांच्या जत्रे’च्या खांबाचे वाजतगाजत स्वागत 

प्रतिनिधी/ काणकोण

पैंगीणच्या श्री बेताळ देवालयाजवळ होणाऱया ‘गडय़ांच्या जत्रे’चा एक खांब वाजतगाजत देवालयाजवळ शनिवारी नेण्यात आला. या खांबासाठी विशिष्ट जातीच्या लाकडाचा वापर करण्यात येत असून यंदा त्यासाठी लागणारे लाकूड पैंगीणच्या एका जमीनदाराने दिले आहे.

या जत्रेसाठी 45 फूट उंचीवर लाकडी माच बसवून त्यावर रहाट चढविले जाते. ऊन – पावसाचा मारा सोसत उभा असलेला हा लाकडी खांब तीन – चार वर्षांनी बदलावा लागत असतो. हा लाकडी खांब नेताना फुलांनी तो सजविला जातो. ढोलताशांच्या गजरात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा खांब श्री बेताळ देवालयाजवळ नेल्यानंतर तो उभा केला जातो. या खांबावर रहाट बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

Related posts: