|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोदाळ- कारापूर येथे दोन घरे चोरांनी फोडली

कोदाळ- कारापूर येथे दोन घरे चोरांनी फोडली 

तीन लाखांच्या सुवर्णलंकारांसह दुचाकीही पळविली

प्रतिनिधी/ डिचोली

डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी मंगळसुत्रे व सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार सुरु असतानाच कोदाळ कारापूर येथे दोन घरे चोरटय़ांनी फोडल्याने पोलिसांसमोर या प्रकरणांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विठ्ठलनगरीत विजयनगर कोदाळ येथील घरांना लक्ष्य बनविताना सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. सुवर्णलंकारांसह चोरटय़ांनी एक दुचाकी पळविली आहे.

सदर घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. विठ्ठलनगरी कोदाळ – कारापूर येथील संदीप नाईक यांच्या घराच्या पुढील दरवाजाची कडी तोडत दोन बेडरुममधील कपाटे फोडली व दोन सोनसाखळ्या, कर्णफुले, अंगठय़ा व इतर सुवर्णलंकार तसेच संदिप नाईक यांची हिरो होंडा पॅशन ही (जीए 04 जे 9235) दुचाकी पळविली आहे.

सकाळी उघडकीस आली चोराr

संदीप नाईक हे रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतले होते. त्यांच्या दुमजली घरात तळमजल्यावर आई वडील व पहिल्या मजल्यावर संदिप हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी त्यांचे आई वडील बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेला दरवाजाला चोरटय़ांनी बाहेरून कडी घातली होती. सकाळी संदिप दुध आणण्यासाठी म्हणून बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडण्यास आले असता दरवाजाला बाहेरून कडी घातल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी शेजाऱयांना सांगून कडी काढून घेतली. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

संदिप नाईक यांच्या घरापासूनच काही अंतरावर विजयनगर येथील विजयकुमार चित्रे यांचेही घर चोरटय़ांनी फोडले. त्यांच्याही पुढील दरवाजाची कडी तोडण्यात आली होती. मात्र या घरात काहीच सापडू शकले नाही.

या दोन्ही घटनांची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक तसेच ठसेतज्ञांनी आपल्या परिने चोरटय़ांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हाती काहीच आलेले नव्हते.

Related posts: