|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » इंधनासाठी आत्मनिर्भर होणार

इंधनासाठी आत्मनिर्भर होणार 

पेट्रोलियम आयात बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न

वृत्तसंस्था/ सिंगापूर 

पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीत कपात करत शून्य टक्क्यांवर आणण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रात मिथेनॉल या पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर भर देण्यात येईल असे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सिंगापूरमधील परिषदेत म्हटले.

भारताला भविष्यात इंधनाची आयात करण्याची आवश्यकता भासणार नाही यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. पेट्रोलियम पदार्थाबाबत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे. ऑटोरिक्षामध्ये एलपीजीचा वापर करण्यात येत आहे. एनएसजी सध्या महत्त्वाचा आहे, मात्र त्याच्या उपलब्धततेबाबत आणि वितरणात अनेक समस्या आहेत. त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे असे नोमुरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते म्हणाले.

इथेनॉलच्या दुसऱया पिढीतील इंधनाच्या उत्पादनासाठी 15 प्रकल्प स्थापन करण्यावर भर देण्यात येत आहे. बायोमास, बांबू आणि कॉटन स्ट्रॉपासून हे इंधन तयार करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

एप्रिल 2016 ते फेबुवारी 2017 दरम्यान 33 दशलक्ष टनाच्या तेल उत्पादनांची आयात करण्यात आली. गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढ झाली. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. सध्या 6.5 टक्के असणारे प्रमाण आगामी तीन ते चार वर्षात 15 टक्क्यांवर नेण्यात येईल.