|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंड संघाची घोषणा

न्यूझीलंड संघाची घोषणा 

वृत्तसंस्था / वेलिंग्टन

येत्या जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी येथे न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाज मॅक्लेनघेन, मिलेनी आणि कॉरी अँडरसन यांचे पुनरागमन झाले आहे.

दुखापतीमुळे मॅक्लेनघेन आणि मिलेनी यांना 2016 च्या क्रिकेट हंगामात बऱयाच सामन्यात खेळता आले नाही. अँडरसनला वारंवार पाठदुखीची समस्या जाणवते. मॅक्लेनघेन, मिलेनी व अँडरसन हे तिन्ही न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा अ गटात समावेश असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश यांचाही सहभाग आहे. ब्रिटनमधील ही स्पर्धा 1 ते 18 जून दरम्यान होणार आहे.

न्यूझीलंड संघ- विलीयमसन (कर्णधार), अँडरसन, बोल्ट, ब्रूम, ग्रॅण्डहोम, ग्युपटील, लेथम, मॅक्लेनघेन, मिलेनी, निश्चॅम, जितेंन पटेल, राँची, सँटेनर, टीम साऊदी, रॉस टेलर.