|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » न्या. भारत देशपांडे दक्षिण गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश

न्या. भारत देशपांडे दक्षिण गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश 

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून उत्तर गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश भारत देशपांडे यांनी काल सोमवारी ताबा घेतला.

न्या. देशपांडे यांनी यापूर्वी दक्षिण गोव्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले होते आणि त्यानंतर त्यांची बदली पणजी येथे झाली होती. पणजीत ते उत्तर गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहात होते. भोपाळ येथील नॅशनल ज्युडिशियल अकादमीने आयोजीत केलेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ प्रिझायडींग ऑफीसर्स ऑफ सीबीआय कोर्ट’ मध्ये न्या. देशपांडे यापूर्वी सहभागी झालेले होते.

दक्षिण गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉश्ता हल्लींच निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

Related posts: