|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात कोंकणी चित्रपट महोत्सव होणे आवश्यक-

राज्यात कोंकणी चित्रपट महोत्सव होणे आवश्यक- 

प्रतिनिधी/ पणजी

कोंकणी ही आमच्या राजभाषा आहे. आम्हाला तिच्याबद्दल आदर आहे. पण आता भाषा जोपासने अत्यंत महत्वाचे आहे. व म्हणून मला वाटते की चित्रपट हे एक उत्तम साधन आहे, त्यामूळे गोव्यात कोंकणी चित्रपट महोत्सव होणे ही तेवढेच आवश्यक आहे. यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.

दालगत कोंकणी अकादमी, तियात्रीस्ट अकादमी गोवा, व मनोरंजन सोसायटी गोवा यांच्या विद्यमाने पणजीत कोंकणी चित्रपट दिवस साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहूणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत तवासीन कार्दोजो, राजेंद्र तालक व ऑगस्टीन तेमोडो उपस्थीत होते.

गोवा म्हणताच कोंकणीच भाषा सर्वात आधी लोकांच्या लक्षात येतात. आज आम्ही कोंकणी चित्रपट दिन साजरा करतो, पण हवी तशी प्रगती या क्षेत्रात दिसून येत नाही. याचे कारण असे नाही की चित्रपट बनने कमी झाले, तर लोकांनी कोंकणी चित्रपट पाहणे कमी केले. आज यासाठी सर्वांनी एकीकडे येण्याची गरज आहे. विविध अकादमीने पुढाकार घेतला पाहीजे तरच आपण आपले गोंयकारपन वाचवू शकतो. कोंकणी चित्रपट महोत्सव आयोजित करणे ही सोपी गोष्ट नाही, यासाठी खुप प्रयत्न करावे लागतील, पण मी मुख्यमंत्र्याशी बोलून हा महोत्सव आयोजित करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच या क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेचा लाभ त्या त्या व्यक्मितकडे पोहचणे तेवढेच गरजेचे आहे, तरच आपण दर्जेदार चित्रपट पाहू शकतो, असे लोबो यांनी पूढे सांगितले.

या कार्यक्रमाची सुरवात फादर ऑफ कोंकणी चित्रपट म्हणून ओळखणारे आल जॅरी ब्रागांझा यांच्या तसबीरला पुष्पहार घालून झाली. यावेळी राष्ट्रिय पुरस्कार मिळालेल्या ऍनिमी चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये चित्रपटाचे निर्माते ए. दुर्गाप्रसाद, दिग्दर्शक दिनेश भोसले, सलील नाईक, मिनाक्षी र्माटीन्स, समीक्षा देसाई, मॅक्सी कोटा, शुबर्ट कोट, व इतर आदींचा समावेश आहे.

 

Related posts: