|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » बनावट पासपोर्टप्रकरणी छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास

बनावट पासपोर्टप्रकरणी छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यासह चार जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बनावट आणि टूरिस्ट व्हिसावर छोटा राजनने भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला.

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने छोटा राजन याच्यासह चौघांना दोषी ठरवलेले आहे. यातील इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. यातील 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिले प्रकरण असेल, ज्यावर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.