|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राज्य महामार्गांवरील दारू दुकाने बंदच ठेवा

राज्य महामार्गांवरील दारू दुकाने बंदच ठेवा 

वृत्तसंस्था/ चेन्नई

रस्ते हस्तांतरीत नियमाचा आधार घेऊन महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील पुन्हा सुरू केलेली दारू दुकाने पुढील तीन महिने बंदच ठेवा, असा महत्त्वपूर्ण आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या निर्णयामुळे राज्यातील 3 हजार तीनशे दारू दुकाने व बार पुन्हा एकदा बंद होणार आहेत. याप्रकरणी विरोधी पक्ष द्रमुकच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील पाचशे मीटरच्या आता असलेली दारूची दुकाने आणि परमीट रूम बंद करण्यात यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्य महामार्ग परिसरातील पाचशे मीटरपर्यंतचे रस्ते महापालिका व नगरपालिकांकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असा आदेश 21 एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारने दिला होता. यामुळे अशा रस्त्यांवरील दारू दुकाने, बारची नियमातून सुटका झाली. ही दुकाने पुन्हा सुरू झाली होती. मात्र विरोधी पक्ष द्रमुकने हा निर्णय न्यायालयाचा अवमान कारणार आहे, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर मंगळवारी तातडीने सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तामिळनाडूतील दारू दुकाने पुढील तीन महिने बंद ठेवण्यात यावीत, असा आदेश दिला.

Related posts: