|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मनपाबैठकीत गाडय़ांचा विषय गाजला

मनपाबैठकीत गाडय़ांचा विषय गाजला 

प्रतिनिधी/ पणजी

 पणजीतील गाजत असलेल्या बेकायदेशीर हातगाडय़ांविषयी काल पणजी मनपामध्ये बरीच चर्चा करण्यात आली. यावेळी मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर व महापौरांमध्ये वाद सुरु झाला. तसेच गाडय़ांची पुन्हा तपासणी करुन तो अहवाल सादर करण्याची मागणी महापौरांनी यावेळी केली. यासाठी गाडेधारकांना आणखी पंधरादिवसांची मुदत दिली असून त्यांनतर त्यांची कायदेशीर चौकशी होणार आहे, असे कालच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

 गेल्या आठवडय़ात पणजी मार्केट समितिचे अध्यक्ष उदय मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजतील गाडय़ांची तपासणी केली होती. यातील काही गाडे एकाच नंबरचे आढळल्याने पणजीत बेकायदेशीर गाडे आहे हे स्पष्ठ झाले होते. तसेच हे गाडे रात्रीच्या वेळी रस्त्यावरच असतात ते मालक घरी घेऊन जात नाही. उच्च न्यायालयाचा आदेशानुसार या गाडय़ांची चौकशी करण्याची सुचना मार्केट समितीला दिली होती. त्यानुसार या गाडय़ांची चौकशी करण्यात आली आहे. कालच्या बैठकीत या विषयप्वर चर्चा करण्यात आली तसेच सर्व गाडेधारकांना आणखी पंधरा दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर त्यांची कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश  आयुक्तांनी मार्केट समितीला दिला आहे.

पे पार्किगवर गोंधळ

 गेल्या काही महिन्यापुर्वी पणजी शहरात मनपाने सुरु केलेल्या पार्कीकचे तीन तेरा वाजल्याने हा विषय कालच्या बैठकीत बराच गाजला. पणजीतील वाहतुकीवर शिस्त आणण्यासाठी मनपाने पे पार्किंग सुरु केली होती. पण ती व्यवस्थित चालत नसल्याने काल नगरसेवकांनी या विषयी महापौरांना जाब विचारला तसेच पे पार्कींगचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराचे नाव कळय़ा यातीत नेंद करण्याची मागणी केली. तसेच त्यांच्याकडून हे कंत्राट काढून ते नवीत कंत्राटदारांला देण्याची मागणी केली. पणजील पे पाकींग वेवस्थित चालत नसल्याने पुन्हा पणजीत बेशिस्त पार्कीग सुरु झाली आहे. यावर ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

मार्केटचा विषय गाजला

 गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेला मार्केटचा विषय कालच्या बैठकीत बराच गाजला. मार्केटमध्ये होणाऱया बेकायदशीर व्यवसायावर मनपाचे लक्ष नसल्याने नगरसेवकांनी महापौर तसेच आयुक्तांना धारेवर धरले. मार्केटमधील दुकानांचे कायदेशीर चौकशी करुन ती कुणाच्या नावावर चालविली जातात याची चौकशी करण्याची मागणी केली. मार्केटचे वीज बील करोडो रुपयांचे आहे हे पैसे कुणाकडून वसूल करावे याविषयी चौकशी करण्यात आली. मार्केटमध्ये अनेक दुकाने आहे. ती कुणाच्या नावावर आहे व कोण चालवताना याची चौकशी करावी. तसेच त्यांच्याकडून मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात काळा बजारा सुरु आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी या बैठकीत करण्यात आली. तसेच मार्केटमध्ये जे बेकायदशीर व्यवसाय करत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही या बैठकीत झाली.

 पणजी मार्केटमधील सोपो कर मनपाला व्यवस्थित मिळत नाही त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. जे विक्रेते व्यवस्थित सोपो कर भरत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अनेक वर्षापासूनचा सोपा कर मनपाला येणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये हा सोपो कर चौरस मीटर मागे वाढविण्यात आला आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून व्यवस्थित कर गोळा करुन मनपाच्या आर्थिक विकासमध्ये भर घालण्याची मागणी यावेळी मनपाच्या बैठकीत करण्यात आली.

 रिलायन्स कंपनीचे कॅबलसाठी बेकायदशीर सुरु असलेले खोदकाम बंद करण्याची मागणी यावेळी मानपातर्फे करण्यात आली. रिलायन्स कंपनीय कॅबलसाठी पणजीत ठिकठिकाणी खोंदकाम करुन लोकांना नाहक त्रास करत आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱयांना त्यांचा त्रास होतो. खड्डे व्यवस्थित भरले जात नाही. पणजीतील रिलायन्स कंपनीचे खोदकाम सुरु आहे. ते बंद करावे अशी मागणी करण्यात आली. त्यांच्याकडून पैसे वसुल करण्याची मागणी करण्यात आले

 पणजी शहरातील महात्मा गांधी रस्त्याकडे असलेल्या जॅक्सन जॉन या दालनाची वीज व त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पणजीतील मिनीनो रेंसिंडेन्सी या ईमारतीच्या मालकांकडून पैसे वसूल करावे असे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच नगरविकस मंत्र्यांनी सुरु केलेल्या महानगरपालीका ऍक्टची  अंबलबजवाणी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच प्रत्येक वर्षी 20 फेब्रुवारीला दरवर्षी आर्थसंकल्प घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. यावेळी अन्य अनेक विषयावर विरोधी नगरसेवकांनी महापौरांना धारेवर धरले.

Related posts: