|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मायनिंग शाखेतील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मायनिंग शाखेतील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार 

प्रतिनिधी/ फोंडा

फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मायनिंग (खाण) शाखेतील विद्यार्थ्यानी काल मंगळवारपासून वर्गावर बहिष्कार घातला आहे. महाविद्यालयातील शिक्षकाना गेल्या पाच महिन्यापासून मासिक वेतन मिळाले नसल्याने येत्या 5 मे पासून कामावर न येण्याचा इशारा दिला आहे या निर्णयाला अनुसरून येथील मायनिंग शाखेतील 90 विद्यार्थ्यानी शैक्षणिक नुकसान हेईल या भितीने वर्गावर बहिष्कार घातला आहे सरकारने यात हस्तक्षेप करून परिस्थितीवर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.

2012 साली सुरू करण्य़ात आलेल्या मायनिंग विभागाची तीन वर्षाच्या करारा वर सेझा व खाणमालकांच्या वरदहस्ताने हे विभाग सुरळीत चालत होते. परंतु दोन वर्षाच्या खाण बंदीच्या नामुष्कीमुळे या विभागात काम करणाऱया एकूण पाच शिक्षकांना व इतर कर्मचाऱयाना भविष्याची चिंता सतावू लागली आहे. गेल्या चार महिन्यापासून मासिक वेतन न मिळाल्य़ाने शिक्षक व कर्मचारी हतबल बनले आहे.य्

वार्षिक परीक्षा 18 मे पासून सुरू होणार असून त्याआधी 5 मे पासून शिक्षक संपावर जाणार असल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात भीतीचे वातावरण आहे. एकूणच शिक्षकाअभावी परीक्षा व प्रात्यक्षिक या विचारांमुळे विद्यार्थ्याना चिंता सतावू लागली आहे. यावर शिक्षण खात्य़ाने योग्य तोडगा काढावा व या विद्यार्थ्याच्या होणाऱया शैक्षणिक नुकसानीपासून वाचवावे अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे.

याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि. एन शेट यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

Related posts: