|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » शेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक

शेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरू आहे. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने 30 हजाराचा पल्ला ओलांडला असून निफ्टी बुधवारी पहिल्यांदाच 9,337.90 या ऐतिहासिक स्थानी पोहोचला.

जागतिक भांडवली बाजारातील साथ देणाऱया निर्देशांकांनी मंगळवारी मोठी सत्रझेप नोंदविली होती. मंगळवारी निफ्टी प्रथमच 9,300च्या विराजमान झाला होता. तर सेन्सेक्स 287.40 अंश वाढीसह 29,943 वर विराजमान झाला होता. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. सेन्सेक्स 111.83 अंशानी वाढून 30,055.07वर असून मोर्चा 2015नंतर सेन्सेक्सने पहिल्यांदाच 30 हजाराचा पल्ला ओलांडला आहे. तर निफ्टीने 31 अंशाची झेप घेत 9,331चा पल्ला ओलांडला.

 

Related posts: