|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अबब.. शहरातील 1236 वृक्ष घाला

अबब.. शहरातील 1236 वृक्ष घाला 

प्रतिनिधी /सातारा :

शासन वृक्षरोपणासाठी नवनवीन योजना आणत आहे. शतकोटी वृक्ष लागवड ही योजनाही आणली आहे. त्यामध्ये सातारा पालिकेने नुकतेच शहरातील 68 जणांना 1263 वृक्ष व 35 वृक्षांच्या फांद्या तोंडण्यासाठी हरकती मागवल्या आहेत. त्याला कडाडून विरोध होवू लागला असून थेट सत्ताधारी साविआवर सर्वसामान्य लोक निशांना साधू लागले आहेत.

शहर हरीत शहर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्था पावसाळय़ात झाडे लावा हा उपक्रम राबवतात. दरवर्षी नवीन नवीन झाडे लावली जातात. शासकीय जागेत, डोंगर माळावर झाडे लावण्यासाठी शासनाने पालिकेला तीन वर्षासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधीही दिला आहे, असे असताना नुकतेच पालिकेने तब्बल 68 जणांना झाडे तोडण्याबाबत परवानगी देण्यासाठी सात दिवसांच्या हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस अधीकक्ष सातारा यांनी नवीन बांधकामासाठी मल्हारपेठ व करंजे येथील नारळ, लिंबू, कडीपत्ता, आंबा अशी 1 हजार 69 झाडे तोडण्याची परवानगी मागीतली आहे. तसेच पालिकेनेही दुर्गा चेंबर येथील वटलेले झाड, पोहण्याचा तलाव येथील झाडझुडपे, मंगळवा तळे येथील झाडझुडपे तोडण्याची परवानगी मागितली आहे. लता पवार या नगरसेविकेनेही बसाप्पा पेठेतील जंगली झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी मागितली आहे. नगरसेवक विजय काटवटे, स्नेहा नलावडे, मनिषा काळेखे, रजनी जेधे, कुसूम गायकवाड, वसंत लेवे या नगरसेवकांनी झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. तसेच सैनिक स्कूल, छत्रपती शिवाजी कॉलेज, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सुद्धा परवानगी मागितली आहे. वीरशैव ककय्या समाज मंदिरानेही बाभळीचे झाड तोडण्याची परवानगी मागितली आहे.

तसेच झाडे तोडायचा कुठलाही ठराव झालेला नाही, हा सत्तेचा गैरवापर आहे. वृक्षतोडीचे समर्थन करणारी पालिकेतील सत्ताधारी दिसत आहेत. एका बाजूला 1 कोटी वृक्ष लावण्याचे टार्गेट असताना गेल्याच मिटींगमध्ये वृक्ष तोडायचे असेल तर किमान दहा ते पंधरा फुटाचे दहा वृक्ष घ्यायचा ठराव झाला आहे, असे असताना एवढी झाडं तोडायचा प्रस्ताव मंजूरच कसा झाला. त्याला स्थगिती द्यावी, वृक्षतोड समिती स्थापन करावी जेणेकरुन दरवर्षी निर्णय घेतले जातील, असे सनी शिंदे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य यांनी सांगितले.

Related posts: