|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महागाई नियंत्रणासाठी शेतीमालाचे दर पाडले

महागाई नियंत्रणासाठी शेतीमालाचे दर पाडले 

कराड:

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून 9 हजार शेतकऱयांनी आत्महत्त्या केल्या आहेत. आत्महत्त्यांचे हे लोण आता कृष्णाकाठासारख्या सधन भागात आले असून दोन महिन्यात पाच शेतकऱयांनी जीवन संपवले. मात्र राज्य सरकारला शेतकऱयांची अजिबात काळजी नाही. सरकारचे लक्ष फक्त शहरी भागातील मतदारांवर असून शेतकऱयांना त्यांनी वाऱयावर सोडले आहे. शहरी मतदारांना महागाईचा त्रास होऊ नये म्हणून शेतीमालाचे दर पाडण्याचे षडयंत्र करत शेतकऱयाला देशोधडीला लावण्याचा उद्योग फडणवीस सरकारने केल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित संघर्ष यात्रेच्या सभेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी, जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रवीण गायकवाड, जितेंद्र आव्हाड, मोहनशेठ कदम, संजय दत्त, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार सुमनताई पाटील, आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले आहे. आज त्यांच्या कर्मभूमीत शेतकऱयांसाठीचा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात पसरले असून एवढी हलाखीची स्थिती यापूर्वी कधी झालेली नव्हती. तुरीचे शेवटचे पोते विकत घेण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र आता तुर खरेदी केंद्रे बंद करण्याचा डाव सरकारने सुरू केला आहे. आमच्या दबावानांतर 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांची मुदत वाढवली आहे. शेतकरी असंघटित असल्याचा मोठा गैरफायदा भाजपा सरकारने घेतला आहे. शेतकरी आंदोलन करू शकत नाही. त्यामुळे आपण काहीही केले तरी चालते, असा भाजपा सरकारचा समज आहे. मात्र शेतकऱयांच्या पाठिशी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे असून भाजपाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही.

Related posts: