|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » JEE Mainsमध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात पहिली

JEE Mainsमध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात पहिली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परिक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकीमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

अभियंत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱया या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. वृंदा ही नाशिक रोड येथील सेंट झेविअर्स हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने दहावीत 94 टक्के गुण मिळवले होते. पंचवटी महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा दिली आहे.

 

Related posts: