|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे : सर्वोच्च न्यायालय

देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकपाल कायदा आहे त्या परिस्थितीत लागू करा, लोकपाल बिलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली त्याची अंमलबजावणी टाळणे योग्य नाही, देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल नियुक्ती अशक्य असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. मात्र, इतर सदस्यांनी लोकपालची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी, यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच लोकसभेत सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाला लोकपाल नियुक्ती समितीमध्ये घ्यावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.