|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » जीएसटी दर असणार समाधानकारक

जीएसटी दर असणार समाधानकारक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

नवीन वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील कर व्यवस्था निर्धारित करताना कोणलाही असंतुष्ट करण्यात येणार आही. सध्या असणाऱया करांच्या तुलनेत नवीन दर कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कंपन्यांनी जीएसटी करातील कपातीचा लाभ ग्राहकांना दिला पाहिजे आणि सध्या केंद्र आणि राज्य यांच्यातील दरांचा प्रभाव समाप्त झाला पाहिजे असे अरुण जेटली यांनी म्हटले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी मंडळाची 18-19 मे रोजी श्रीनगरमध्ये बैठक होणार आहे. यावेळी विभिन्न वस्तू आणि सेवांच्या दरांना अंतिम रुप देण्यात येणार आहे. यामुळे सध्या वापरात असणाऱया किमान 10 अप्रत्यक्ष करांचे एकीकरण करण्यात येईल. जीएसटी लागू करण्यासाठी सर्व नियम आणि नियमन तयार करण्यात आले आहेत. आता अंतिम पातळीवर पोहोचल्याचे जेटली यांनी सीआयआयच्या वार्षिक बैठकीत बोलताना सांगितले.

जीएसटी कोणत्या कार्यपद्धतीनुसार लागू करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज परविण्याचा प्रयत्न नही. केंद्रीय उत्पादन कर, सेवाकर आणि व्हॅट यांचे एकीकरण करत जीएसटी परिषदेने 5, 12, 18 आणि 28 टक्के कर निर्धारित केला आहे. सध्याची कर पातळी आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात बदल करण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत जीएसटीच्या परिषदेच्या 13 बैठका झाल्या आहे आणि त्यामध्ये कोणत्याही विषयावर मतभिन्नता दिसून आलेली नाही, असे त्यांनी म्हटले.

 

Related posts: