|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डीमार्टच्या समोर महामार्ग फोडला

डीमार्टच्या समोर महामार्ग फोडला 

प्रतिनिधी /गोडोली :

राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टसमोर एका स्पॉटवर तीन मुलींचे बळी गेल्यावर संबंधित विभागाला तात्पुरती जाग आली होती. याच वळणावर डी मार्ट, हॉटेल, वाहन विक्रीचे शोरूम व्यावसायिकांनी महामार्गालगत तोडफोड करून बेकायदेशिररित्या पुन्हा रस्ता करण्याचे धाडस केले आहे. यामुळे हा स्पॉट जीवघेणा ठरत असून रोज किरकोळ अपघातांमध्ये वाढ होवू लागले आहे. महामार्गालगत तोडफोडीचे धाडस संबंधित विभागाच्या अधिकाऱयांबरोबर आर्थिक तडजोडीने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

महामार्गावर हा स्पॉट अत्यंत धोकादायक झाला असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर रस्ता बंद झाला पाहिजे. राष्ट्रीय महामार्गालगत अनेक ठिकाणी तोडफोड करून रस्ते करणारे आणि त्यांना साथ देणाऱया महामार्ग प्रशासनातील दोषी अधिकाऱयांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे.

 राष्ट्रीय महामार्गालगत साताऱयापासून 8 किलो मीटर अंतरावर डी मार्ट शोरूम बरोबर अन्य काही व्यवसाय सुरू आहेत. मार्टमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या दोन सख्या बहिणींसमवेत त्यांच्या एक मैत्रिणीचा येथील वळणावर अपघातात बळी गेला होता. यावेळी डी मार्ट आणि शासनाने निष्पाप बळी गेलेल्या मुलींच्या कुटुंबाला कवडीची मदत केली नाही. त्यावेळी जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देऊन त्या स्पॉटवरील बेकायदेशीरपणे तोडलेला रस्ता तात्काळ बंद केला. यामुळे व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला. महामार्गाखालून पर्यायी पुलाची व्यवस्था केली असून हे गैरसोयी होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱयांच्या समवेत आर्थिक तडजोड करून थेट राष्ट्रीय महामार्गालगत व्यवसायधारकांनी तोडफोड करण्याचे धाडस केले.

Related posts: