|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » …तर सरकारला बदडून काढायलाही सज्ज रहा

…तर सरकारला बदडून काढायलाही सज्ज रहा 

प्रतिनिधी /सातारा :

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद यात्रेची घोषणा केली आहे. या सरकारला मस्ती तरी कशाची आली आहे. कर्जमाफी, किमान आधारभूत दर देणे लांबच मात्र, मुख्यमंत्री आम्हालाच नालायक, कोडगे, निर्लज्ज म्हणून आमची हेटाळणी करत आहेत. हे सरकार करंटे, बेजबाबदार आहे. जर कर्जमाफी न होता तुमच्या दारात ‘संवाद यात्रा’ आली तर फडणवीस सरकारला कर्जमाफीचा जाब तर विचाराच त्याचबरोबर त्यांना बदडून काढायलाही मागे पुढे पाहू नका, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष यात्रेच्या तिसऱया टप्यातील समारोपप्रसंगी काढले. तर कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने हीन दर्जाची भाषा वापरली नव्हती ती भाषा हे फडणवीस वापरत आहेत, याच अनुषंगाने नेत्यांनी मिळून शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी गांधी मैदानावर टाहो फोडला.  

महाराष्ट्रातील शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतमालाला किमान आधारभूत दर मिळाला पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर जिह्यातून सुरु झालेली राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, युनायटेड जनता दल, रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांची सरकारविरोधी ‘संघर्ष यात्रा’ गेले तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात असून गुरुवारी ती जिह्यात होती. याची सांगता रात्री येथील गांधी मैदानावरील सभेने झाली. 

Related posts: