|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याला पकडले

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याला पकडले 

आनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका जिवंत दहशतवाद्याला पकडण्यात सुरक्ष्हह रक्षकांना यश आले आहे. हा दहशतवादी जवानांनकडील शस्त्रास्त्र घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक कशली. विशेष म्हणजे,या दहशतवाद्याने कॅमेरासमोल आपला गुन्हा ही कबुल केला आहे.

या दहशतवाद्याचे नाव मुनीब असे असून हा दहशतवादी गणेशपुरामधील बिजबेहराचा रहिवासी आहे. काल दुपारी दोनच्या सुमाराश दोन दहशतवाद्यांनी लाला चौकातील एका बँकेच्या शाखेवर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवनावर गोळीबार केला. यानंतर हिज्बुल मुजहिदीनचा दहशतवादी पळून गेला. पण त्याचा साथीदार मुनीबला पकडण्यात जवानांना यश आले. दुपारी ज्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी बँकेतील कर्मचारी नमाज पठण करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

 

Related posts: