|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सभापतींचा फोन स्वीचऑफ

सभापतींचा फोन स्वीचऑफ 

प्रतिनिधी /सातारा :

शहरात बहुतांशी भागामध्ये गेली दोन ते तीन दिवस पाणीच आले नसल्यामुळे सातारकर हैराण झाले होते. नागरिकांनी आपाआपाल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काही नगरसेवकांचे फोन स्वीचऑफ तर काही नगरसेवकांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. तसेच पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांचाही फोन बंद दाखवत होता. तर टँकर दुरुस्तीसाठी गॅरेजाला गेला आहे, असेही सांगण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांची पाण्यासाठी आभाळ होत असल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष सुनील काळेकर यांनी पत्रकाद्वारे केला असून त्यांनी त्यामध्ये भाजपाने स्वखर्चाने पाणी पुरवठा केल्याचे सांगितले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेल्या तीन दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणीच आलेले नाही. सातारकरांनी यामुळे प्रभागातील नागरिकांना फोनवरुन तर पालिकेत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. फोनही उचलला गेला नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होवू लागला आहे. पालिकेचा असलेला टँकरही बंद स्थितीत गॅरेजमध्ये आहे.

मी रजेवर, आल्यानंतर बघू सगळं..

पालिका प्रशासननंतर काहींनी सभापती सुहास राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचाही फोन बंद होता. मुख्याधिकारी यांना फोन लावला असता यावर मुख्याधिकारी यांनी मी पंधरा दिवस रजेवर आहे, असे सांगितले. साताऱयात काय चालले आहे मला माहिती नाही मी आल्यानंतर सगळे सुरळीत करेन अशा पद्धतीने उत्तर दिले. त्यावर तुम्ही येईपर्यंत पाण्यासाठी वंचित राहयचे काय? मुख्याधिकाऱयांनी यावर प्रयत्न करतो असे सारवासारवीची उत्तर देवून फोन बंद केला. त्यामुळे काळेकर यांनी प्रभाग क्र. 6,7 व प्रभाग क्र. 1 च्या स्वखर्चाने 27 रोजी रात्री उशीरापर्यंत पाणी पुरवठा केला. यावेळी नागरिकांनी पालिकेच्या भेंगळ कारभार सुरु आहे. सध्या पाणी कपात जाहीर केली असून खरेतर सातारकरांवरती पाणी कपातीची वेळ यावीच कशासाठी शहरातील अनेक ठिकाणी पाण्याची गळती थांबवल्यास पाणी कपातीची वेळ सातारकरांवर येणार नाही. यामुळे पालिकेत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे, असा आरोपही काळेकर यांनी केला आहे.

Related posts: