|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात : नीति आयोग

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात : नीति आयोग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2024 साली होणाऱया लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, असा सल्ला नीति आयोगाने निवडणूक आयोगाला दिला. तसेच ‘प्रचार मोड’च्या कारणामुळे शासन व्यवस्थेमध्ये कमीत कमी वेळेत केला जावा, असेही आयोगाने म्हटले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकारचा प्रस्ताव लागू करण्यासाठी काही विधानसभांच्या कार्यकालात काही कपात किंवा विस्तार करण्याची गरज पडू शकते. तसेच या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. याचबरोबर नीति आयोगाने दीर्घकालीन चालणाऱया प्रकरणाच्या मुद्यांवर समाधानासाठी ‘न्यायिक कार्यप्रदर्शन सूचकांक’ चालू करण्याचा सल्लाही दिला आहे.