|Monday, September 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये लहान मुलींची निरागस अदाकारी

‘ढोलकीच्या तालावर’मध्ये लहान मुलींची निरागस अदाकारी 

महाराष्ट्र दिनानिमित्त ढोलकीच्या तालावर घेऊन येत आहे या कार्यक्रमाचे तिसरे पर्व एका नव्या ढंगात. या संपूर्ण पर्वामध्ये लावणी जोडीने सादर होणार आहे. छोटय़ा अप्सरांना मोठय़ा लावण्यवतींची साथ मिळणार आहे. हे पर्व लावणीची परंपरा आणि प्रयोगशीलता यांचा संगम असणार आहे. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत ज्येष्ठ नफत्यांगना शकुंतलाताई नगरकर, अष्टपैलू अभिनेता जिंतेंद्र जोशी आणि उत्तम नर्तिका आणि मराठीतील सगळय़ात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. ढोलकीच्या तालावर छोटय़ांची अदाकारी… लै भारी 1 मेपासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वा फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

 

ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य लहान मुलींनी हजेरी लावली. ज्यामधून काही निवडक मुलींनाच या पर्वामध्ये आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि अशा अनेक ठिकाणी जाऊन 12 प्रतिभावान आणि नफत्याची जाण असणाऱया स्पर्धकांना निवडले आहे. प्रचीती कुलकर्णी, अनुष्का देशपांडे, समफद्धी शेडगे आणि अशा लहान लहान मुलींचे नफत्यकौशल्य ढोलकीच्या तालावरच्या नव्या पर्वामध्ये बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना परीक्षकांनी देखील आपली मते मांडली. जितेंद्र जोशी म्हणाला, लावणी हा प्रकार यावेळेस छोटय़ा मुली सादर करणार आहेत. त्यामुळे हा अनुभव नक्कीच खास असणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. तसेच फुलवा खामकर म्हणाली, माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण ढोलकीच्या तालावरद्वारे पहिल्यांदाच एका कार्यक्रमामध्ये लहान मुलींना लावणी करताना बघायला मिळणार आहे. लावणी आणि लहान मुली हे समीकरण वेगळं आहे. कारण, मी बऱयाचदा बघितलं आहे, मुली लावणी करताना वेगवेगळे अंगविक्षेप आणि हावभाव करतात जे खरंतर गरजेचे नसते. लावणी हे सगळं न करता देखील सुंदररीत्या सादर होऊ शकते आणि हेच माझ्या स्पर्धकांना आणि महाराष्ट्रातील सगळय़ा लहान-मोठय़ा मुलींना शिकविण्याची सुवर्णसंधी मला या कार्यक्रमाद्वारे मिळाली आहे असे मला वाटते. तसेच ज्येष्ठ नफत्यांगना शंकुताई नगरकर म्हणाल्या, मला खूप आनंद होत आहे या कार्यक्रमानिमित्त लहान मुली लावणी या नफत्यशैलीकडे वळल्या आहेत. नाहीतर आजकल मुलींचा कल इतर नफत्यप्रकारांकडे जास्त असतो. मला या लहान मुलींचं कौतुक करावसं वाटतं की यानिमित्ताने तरी लोकांना कळेल लावणी काय आहे, आणि या लहान मुलीच लावणीला पुढे घेऊन जातील तसेच प्रतिष्ठा मिळवून हे नक्की.