|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » सैराटला पॅफेमराठीचा अनोखा ग्रँड सॅल्युट

सैराटला पॅफेमराठीचा अनोखा ग्रँड सॅल्युट 

तब्बल एक वर्षापूर्वी सैराट नावाचं एक वादळ आलं होतं. सैराटने फक्त व्यावसायिक समीकरणं बदलली नसून मनोरंजनाच्या सर्वच कक्षा या सिनेमाने पार केल्या होत्या. वर्षभर लोकांमध्ये फक्त याच सिनेमाची चर्चा सुरू होती. अशा या सैराट सिनेमाला पॅफेमराठीने एका अनोख्या पद्धतीने ग्रँड सॅल्युट दिला आहे. पॅफेमराठी युटय़ूब चॅनलवर सैराट वन ईयर स्पेशल ट्रिब्युट या नावाने दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओला लाखोंच्या घरात पसंती मिळाली असून मराठी डिजिटल मनोरंजन विभागात हा असा पहिलाच प्रयत्न करण्यात आला आहे.

पॅफेमराठीचे निर्माते निखील रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांच्या संकल्पनेतून आणि लिखाणातून साकारलेला हा व्हिडिओ दत्ता भंडारे या तरुणाने दिग्दर्शित केला आहे. पॅफेमराठी बिंदास बोल या सिरीजमध्ये या व्हिडिओचा समावेश असून तरुणांची आवडती भक्ती पठारे ही निवेदकाच्या भूमिकेत आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे यात मराठी भाषेच्या अनेक लहेजांचा चपखल वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच महाराष्ट्रातून याला पसंती मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात काम करणारे सर्वच कलाकार हे नवोदित असून ते मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, धुळे, नागपूर, अकोला, कोल्हापूर, सांगली या भागातले आहेत. सर्वांनी पहिल्यांदाच पॅमेराचा सामना केला आहे. व्हिडीओचे छायांकन लक्ष्मण खरात याने केले असून व्हिडिओमध्ये कल्पेश पाटील, शेखर कडू, विजय पवार, रोहित खांडरे, नागेश साळवी, किरण तांबे, प्राज्वली नाईक, पूनम चव्हाण, लीना पाटकर, श्रुतिका तरडे, पूजा परब आणि अश्मिता दोरकुलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.