|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कृषी सेवा केंद्रात दरफलक न लावल्यास कारवाई : नारकर

कृषी सेवा केंद्रात दरफलक न लावल्यास कारवाई : नारकर 

शाहूवाडी / प्रतिनिधी

    शाहूवाडी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकानी खरीप हंगामासाठी पुरेसा प्रमाणात निविष्ठा व खतसाठा उपलब्ध करण्या बरोबरच कृषी सेवा केंद्रात दर फलक लावणे व स्टॉक रजिस्टर ठेवणे बंधनकारक असून, याचे उलंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती कृषी अधिकारी गजानन नारकर यांनी कृषी सेवा केंद्रचालकांच्या आयोजित बैठकी प्रसंगी दिला.

    शाहूवाडी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची खरीप हंगाम 2017 च्या अनुषंगाने पंचायत समिती शाहूवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी तालुक्याच्या भौगोलिक परस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये तालुक्यात घेतल्या जाणारे भात, नाचणी, सोयाबीन या पिकांविषयी माहिती घेऊन आवश्यक प्रमाणात खतसाठा उपलब्ध आहे का, याची माहिती घेण्यात आली.

      रासायनिक खतविक्रीसाठी शासनाने नवी विक्री प्रणाली अमलात आणली असून, एक जूनपासून खत खरेदीसाठी शेतकरी यांना आधार कार्डशिवाय खत मिळणार नसल्याने यासाठी सर्व खत विक्री करणारे कृषी सेवा केंद्रात पीओएसी मशीन ठेवण्यात येणार आहे. यासाठी एफएमएस आयडी नंबर कृषी सेवा केंद्रसाठी आवश्यक आहे. तो नबंर काढण्यासाठी संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांनी दुकान लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आदी कगदपत्रांची पूर्तता करून तो काढणे आवश्यक आहे.

नियमाच उल्लंघन केल्यास कारवाई

बहुतांश कृषी सेवा केंद्रात मालाचा दर फलक, दुकानातील मालाची नोंद असणारे स्टॉक बुक, बिलबुक, प्रथमोपचार औषध पेटी आदी बाबी दिसून येत नाहीत. अशा कृषी सेवा केंद्राची तपासणी करून संबंधित कृषी केंद्रावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही कृषी अधिकारी गजानन नारकर यांनी दिला असून्। पावती देणे ही बंधनकारक आहे.

    दरम्यान शेतकरी बंधुंनी ही परवाना धारक कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे, खते, औषधे खरेदी करून योग्य खबरदारी घेण्याबरोबरच बियाणे पिशवी, टॅग, पावती व्यवस्थित ठेवणे आवश्यक असल्याची सूचना ही कृषी अधिकारी गजानन नारकर यांनी केली आहे.

     या कृषी सेवा केंद्रचालकांच्या बैठकी तालुक्याती विविध विभागातील कृषी सेवा केंद्राचे चालक, प्रतिनिधी उपस्थित होते.