|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोर्ले-सत्तरी येथे ‘बोल बाबू बोल’ नाटय़पुस्तकाचे प्रकाशन

मोर्ले-सत्तरी येथे ‘बोल बाबू बोल’ नाटय़पुस्तकाचे प्रकाशन 

वार्ताहर/ पर्ये

रंगयात्री कला मंच मोर्ले-सत्तरी या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी गौतम वसंत गावस यांनी लिहिलेल्या ‘बोल बाबू बोल’ या विनोदी नाटय़पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर नामवंत नाटय़दिग्दर्शक प्रमोद म्हाडेश्वर, फाईन आर्ट्मधून पीएचडी केलेले डॉ. शिवाजी शेट, रंगयात्री कला मंचचे अध्यक्ष तुषार गावकर, मोर्लेचे सरपंच सुशांत पास्ते, समाजसेवक अमर सूर्यवंशी, लेखक गौतम गावस व विष्णू गावस उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते गौतम गावस यांच्या ‘बोल बाबू बोल’ या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यापूर्वी गौतम गावस यांची फोर इडियट्स, परंपरा, बापायचे पेटूल आणि मोगा उपरांत ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रंगयात्री कला मंच ही संस्था चांगल्याप्रकारे टिकवून संस्थेचे नाव सदैव उज्ज्वल करावे, असे आवाहन प्रमोद म्हाडेश्वर यांनी केले. डॉ. शिवाजी शेट यांनीही विचार मांडले.

यावेळी लोककलाकार अर्जुन रावणकर, नाटय़कलाकार रामा राऊत व डॉ. शिवाजी शेट यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन प्रमोद म्हाडेश्वर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. गौरवमूर्तींचा परिचय व स्वागत रुपा गावडे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा ठाकूर यांनी केले तर प्रीती राणे यांनी आभार मानले. तद्नंतर ‘बोल बाबू बोल’ नाटय़प्रयोग सादर करण्यात आला.

Related posts: